*रामनवमी आणि बैलगाडीची शर्यत*
ही गोष्ट मला फार दिवसापासून लिहायची होती.
रामनवमी ! कोकणातील करक म्हणजे तळवड्यापासून साधारण 8 ते 10 मैलांचा अंतर असलेला गावातील एक महत्वाचा उत्सव . त्या दिवशी रात्री रामाच्या देवळात मुंबईच्या लोकांनी केलेलं नाटक पाहायला स्वतःची बैलगाडी घेऊन जायची प्रथा होती !!
नाटक तितकंच बघितलं जायचं !! कोणाची बैलजोडी नविन आहे , नुकताच घाटावरून नवीन बैल कोणी घेतलाय तसच वायकुल , नारकर, तेलंग, पाथरे हे पचालमधील एक पेक्षा एक श्रीमंत व्यापारी आणि त्याला साजेसह्या त्यांच्या गाड्या & बैल जोड्या असायच्या. हे सर्व वैभव बघायचं एकमेव ठिकाण म्हणजे करकेच रामाचं देऊळ आणि त्या रात्रीची जत्रा.
रामनवमीच्या दिवशी रात्री रामाचं दर्शन घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास स्वच्छ चांदण्यात बैलगाड्या उडवून एकमेकांची बाजू मारून ( overtake करण्याची शर्यत ) परत येण हा स्वयं स्फूर्तीने पिढीजात चालणार कर्यक्रम .
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाचलच्या पेठेत कुणी कुणाची बाजू काढली , त्याची जोडी कितीची , जनावरं कशी आहेत , नुसतीच पाळतात की भरताड (load ) पण ओढतात याच्यावर अगदी चहा, पानसुपारी आणि जोडीला विडीचा धूर काढून गावठी भाषेत सविस्तर चर्चा व्हायची !!
माझं SSC च म्हणजे 1975 चे वर्ष. आमच्या गाडीला सोन्या आणि हौश्या ची पांढरी शुभ्र जोडी होती !! रामनवमीच्या त्या रात्री मी आणि संजू ने रामनवमीला गाडी घेऊन जायचंच अस प्रथम मामीला सांगितलं. मामीने यथावकाश भाऊंच्या कानावर घातलं .( भाऊंना एकदम विचारण्याची हिम्मत त्यावेळीतरी माझ्यात नव्हती 😀😀)
गाडी नेतोयस पण अजिबात पळवायची नाही , कुणाच्याही बाजू बिजू काढायच्या नाहीत असं तींन बजावून सांगितलं तेव्हा भाऊंची परवानगी आहे हे मला समजलं.
आणि रात्री गाडी जुंपून मी आणि संजू रामनवमीला निघालो .
जाताना वाटेत बाजारात (एक ठिकाण ) बाबी कोलते आमच्या गाडीत बाई माणसे नाहीत म्हटल्यावर चढला .
पुढे लगेचच मधूशेठ कासार आम्हाला जरा थांबवून त्यांची गाडी घेऊन ते ही आमच्या बरोबर निघाले . अण्णा ने पण नुकतीच नवी जोडी घेतली होती तो ही पाठोपाठ आला . त्याच्या गाडीत रघूतात्या , विषा , बंड्या असे 6-7 जण होते !!!
नदीतून पहिला चढाव चढून मी वर आलो आणि अण्णाने माझी बाजू मारली आणि पुढे निघून गेला ! तोपर्यंत मधूशेट ची गाडी माझ्या मागे होती !
आम्ही करकेच्या रस्त्याला लागलो आणि साधारण अर्धा मैल गेलो नाही तोच मधूशेटनि पण माझी बाजू मारली !!
मला फक्त मामीला सांगितलेलं आठवत होत " कुणाचीही बाजू मारायची नाही , बैल नवीन आहेत आणि तू अजून लहान आहेस !"
आम्ही देवळात पोचलो , रामाच्या मूर्तीला साष्टांग नमस्कार केला. आणि नाटक वगैरे इकडे ढुंकूनही न बघता गाड्या आणि जोड्या बघायला बाबी कोलत्या बरोबर निघालो ! इकडे तिकडे झाल्यावर बाबी कोलते म्हणाला बाळशेठ जाताना आपण धुरळा नाय खायचा !! नाहीतर मी गाडीवर बसतो !!(मला गाडी पळवण्यासाठीची ही जणू सूचना होती )
तिथे मला माझा मित्र राजा नारकर भेटला, त्याचीही जोडी नवीनच होती पण थोडी डावी उजवी होती म्हणजे एक बैल जरा मोठा व दुसरा लहान होता तो म्हणाला " बामना तुझा एक बैल माझ्या बैलाच्या गळ्यात बांधून कशी जोड होते बघूया , जरा जाऊन येऊ डावच्या आंब्या पर्यंत "(हे रस्त्यावरील एका जागेच नाव)
काही हो नाही म्हणेपर्यंत त्याने त्याचा एक बैल सोडून आणला आणि आम्ही बैलांची अदलाबदल करून दोन्ही गाड्या दोन मैल नेऊन मधेच बाजू बिजू मारून कसे दोन्ही बैल छान जोड करतात ते बघून पुन्हा परत आलो.
हे सगळं करायला मी आणि संजू होतो आमच्या बरोबरचा बाबी कोलते कुठे गायब झाला होता माहीत नाही !!
आम्ही परत येत असताना तिथे बाबी हजर झाला आणि "बाळा तुझा बैल तू त्याच्या गाडीला बांधलासच कसा " अस विचारू लागला कारण अस करणं हे बैलगाडी आणि त्याची प्रथा यांच्या विरुद्ध असत !!
आता हे भाऊंना कळलं तर काय हे ऐकून मला ब्रम्हांड आठवलं !असो.
थोडा वेळ इकडे तिकडे करून मी आणि संजूने गाडी जुंपली आणि परत निघालो. आमच्या गाडीत आता बाबी कोलते बरोबर हसन पाटणकर हा ही होता!
हसन पाटणकर म्हणजे बैलांची उत्तम पाडख (परीक्षा) असणारा , बैलांवर अतिशय प्रेम करणारा, बैलगाडीची सगळी कसब(कला , expertise ) कोळून प्यायलेला अस्सल मुसलमान माणूस !
आम्ही जशी गाडी जुंपली तशी पाठोपाठ सर्वच गाड्या निघाल्या.
काय मस्त माहोल होता !! रात्रीचे दीड दोन वाजले असावेत, आकाशात स्वछ चांदण होत , हवा थंड आणि अल्हाददायक होती !! आणि अशा बेभान क्षणी मी गाडीवर बसलो आणि थोडं पुढे गेल्यावर पुढची गाडी बघितल्यावर माझं रक्त सळळायला लागलं !!
राजा नारकरच्या गाडी पुढे होती. त्याच्या बैलांची मला माहिती होतीच !! थोडं बरोबर गेल्यावर हौशाच्या अंगाला कासरा लावल्याबरोबर तो असाकाय झपकन आत आला आणि चौखूर उधळला की मी केव्हाच पुढे आलो आणि बैल आपणहून मनापासून पळतायत याची मला जाणीव झाली !! माझाच मित्र तो एकच हुल्लड झाली !! अशावेळी बैल बुजले नाही पाहिजेत आणि पळताना त्यांनी रस्ताही सोडला नाही पाहिजे !! नाहीतर कपाळमोक्ष ठरलेलाच !!
लगेचच पुढच्या काही क्षणात मधूशेठ आणि अण्णाच्या गाडीच्या पुढेही मी गाडी काढली आणि आता भाऊ पाथरे पाचलचे व्यापारी , रु.10000 ची नवीन बैलजोडी माझ्या मागे येतेय अस बाबी कोलते मला सांगेपर्यंत त्यांनी माझी बाजू कधी मारली मला समजलंच नाही!!
बाबी कोलते म्हणाला बालशेठ "त्यांची जोडी कुठे आणि आपली कुठे जाऊदे त्याना !!"
आतापर्यंत हसन पाटणकर मागे शांत बसून मजा बघत होता तो लुंगी सावरून एकदम उठला आणि म्हणाला " बाळशेठ तुमचा आतल्या सोग्याचा बैल काय म्हणतोय तुमच्या लक्षात आलं काय ? " ( डाव्या बाजूचा बैल हा गाडीचा जसा control असतो तसाच overtake करताना नुसत्या इशाऱ्यावर त्याने झटकन पुढे व्हायचं असत पण गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊ द्यायची नसते !! हे फक्त जातिवंत जनावरच जे मनापासून पळणार असत तेच करू शकत!!पळताना तुमच्या इशाऱ्याची तो बैल वाट बघत असतो!! ते फक्त गाडीवान आणि त्याचे बैल यांनाच ते समजत !!
"मी गाडीवर बसू काय शेट "!! आतापर्यंत मागे शांत बसणाऱया हसने विचारलं !! खरा गाडीवानच तो !! पाथऱ्याची गाडी पुढे गेलेली त्याला सहन नाही झाली आणि त्याचं रक्त गरम झालं !!
मी सरळ मागे झालो आणि हसनला म्हटलं ये पुढे !!
तो म्हणाला गाडी उभी करा शेठ !!
खाली उतरून त्याने एकदा गाडीची चाक, कडाण्या (tyrela जसे nut असतात तस चाक बाहेर येऊ नये म्हणून असलेली लोखंडी पट्टी ) वरून नजर मारली आणि कासरा (बैलांना कंट्रोल करण्याची दोरी ) धरून ढकलिलवर पाय देऊन एकदम तीकट्यात ( driving seat) बसला ! ( जातिवंत गाडीवान असेच गाडीत चढतात , जसे ST चे ड्राइवर चढतात )आणि बैलांच्या पाठीवरून हात फिरवला , दोन्ही बैलांना चांगलं थोपटल आणि तोंडाने tauk tauk असा आवाज काढला गाडी पौंडावर धरली ( बैल एकदम झप झप चालतात त्याला अस म्हणतात )
पुढे वायकुळाची आणि तेलंगांची गाडी होती . हसनने उजव्या बाजूनेच आमची गाडी त्यांच्या जवळ आशिकाय आणली आणि उडवली की झटक्यात त्याने दोघानाही मागे टाकलं !!
आता मगाशी माझ्या पुढे गेलेल्या पाथरयांच्या गाडीच्या मागे आमची गाडी होती !!
बाबीशेठ हाच मघाशी पुढे गेला होता ना !!! अस हसन म्हणाला आणि लुंगी सावरून बसला " हसन - "बाळशेठ बैलाच ऐकाच का !!! "
मी हो म्हणून ओरडलोच !!
नीट खाली धरून बसा !!
हसनचा इरादा समजला!!!
बाबी कोलते म्हणाला "पाथरयांच्या गाडीचा नाद नका करू हसन भाई ! ते कुठं आणि आम्ही कुठं ! त्यानच्या एका बैलाच्या किमतीपेक्षही कमी किमतीची आमची जोडी!!!!"
एवढं बोलून डावाच्या आंब्याचा उतार आम्ही पाथरयांच्या गाडीच्या मागूनच उतरलो !!( उतारावर गाडी पळवता येत नाही )
झालं आता हसन ढोपरांवर उभा राहून गाडी हाकित होता !! आणि त्याने भाऊ पाथरयांच्या गाडीची बाजू काढायला सुरवात केली!! त्यांच्या गाडीची जनावरसुद्धा हरणासारखी पळणारी होती !! दोन्ही गाड्या एकमेकांच्या बाजूला सारख्या जवळ जवळ अर्धा मैल पळत होत्या . कोण पुढे जाईना!! आरोळ्या उठत होत्या !!
हसन खुरमांडी टाकून बसला होता !! रस्त्यावर धुरळा, चित्कार , गाडीच्या चाकांचा भयावह आवाज आणि बेभान झालेली चार जनावर चौखूर उधळली होती !! हसनने एका क्षणी हौशाच्या अंगाला कासरा लावला फक्त ज्याची ते मूक जनावर वाटच पहात होत !! आणि अशी काय त्याने उडी घेतली की सटकन गाडी पुढे आली !!
पाथरेच ते !! आता रवींद्र म्हणजे भाऊ पाथरयांचा मुलगा स्वतः गाडिवर बसला !!
आमची गाडी पुढे होती पण ते ही काही कमी नव्हते ! पुन्हा गाड्या उधळल्या !!! दोघेही गाडीवान अक्षरशः इरेला पेटले होतें! जरा जरी बैलांची उडी इकडे तिकडे झाली तर.. तर .. नको ती कल्पनाच नको !! आणि .. आणि ..रवींद्रने आमची बाजू मारलीच !!
ते कमी नव्हते तसाच हसन पाटनकरच तो !! हार मानण शक्यच नव्हतं नव्हे तो आता माझंही म्हणजे मालकाचंही ऐकणं शक्य नव्हतं !!
शेठ अजून एक माल बाकी आहे ,पाचल गाठायला! ( दोन मैल अंतर )
आता हसन गाडीवर कासरा धरून जवळ जवळ उभाच होता !!
त्याने पुन्हा एकदा आपलं कसब पणाला लावलं आणि जीवाची पर्वा न करता गाडी उडवली . पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एकमेकाला भिडल्या !! चार बैल आणि दोन गाडीवान यांची ती झुंज होती !! बाबी कोलते मला बिलगला आणि आता काय होणार माहीत नाही बाळा ! अस म्हणाला !! गाडीच्या चाकांचा कडकडाट, रस्त्यावर खूप उडालेली धूळ, आरोळ्या आणि पोटात थरकाप !! जिवाच्या आकांताने चारही बैल नुसते पळत होते ! हसनने झटकन हौशया बैलाच्या अंगाला नुसता कासरा लावला बस आणि तो बैल
असा काय उडी मारुन पळाला की क्षणात गाडी त्यांच्या पुढे आली!!
पुढे जाऊन हसनने गाडी उभी केली !! मी सांगत होते हसंभाई आता थांबू नका !! पण माझं ऐकण्याच्या मनःस्थितीत तो नव्हताच !!
त्यांचीही गाडी मागून येऊन थांबली !!
आणि हसन ने सरळ सरळ रवींद्रला आव्हान दिलं !!
रवी !!! माझी बाजू मारायची तर बातच सोड !! तू माझ्या पुढे जाऊच शकत नाहीस पण जर तुझ्या बैलाच तोंड जर माझ्या गाडीच्या मुंग्यास जरी लागलं (बुम्परला बंपर touch जरी झाला तर )तुझ्याकडे एकवर्षं फुकट गडी राहीन !! चल रायपाटण ( आमच्या घरी जायचा रस्ता बाजूला राहिला केवळ शर्यत म्हणून आणखी पुढे 5- 7 मैल) पर्यंत जाऊया !!
पुढे सांगायला नकोच दोन गाड्या आशा काय उधळत होत्या की ज्याच नाव ते !! एक वेळ मला वाटलं हसन हे काय बोलून बसला !! कारण थोड्यावेळापूर्वी दोन्ही जोड्याची पळण्याची कुवत मी पहिली होती आणि आमच्यापेक्षा ते बैल मोठे असल्यामुळे साहजिकच त्यांच्या उड्या मोठ्या होत्या !!
२ - ३ वेळा त्यांची गाडी जवळ आली की हसन अस काय बैलाना पळवायचा की ते आम्हाला गाठूच शकले नाहीत !! शेवटी त्याच्या आणि आमच्या गाडीत खूप अंतर पडलं !!
पाचलच्या तिठ्यावर गाडी उभी केली आणि बैलांच्या पाठीवर पुन्हा थोपटून हसन उतरला !!
मी त्याला विचारलं हसनभाई त्यांची गाडी आपल्या पुढे जाणार नाही याचा अंदाज तुला कसा आणि केव्हा आला !!
हे बघा बालशेठ आतल्या सोग्याचा बैल पळताना कान मागे करून जेव्हा तुमच्या इशाऱ्यावर पळतो तेव्हा समजायचं ते जनावर रस्ता सोडणार नाही आणि तुमच ऐकणार बाकी वेळ आपण साधायची !! अशी बैलांची जोड कधीतरीच होते !! बाकी जर बैलांनी ठरवलं रस्याबाहेर उडी टाकायची तर आपण अल्लाह प्यारे झालो म्हणूनच समजा !!
आणि रवी इथेच फसला !! दोन्ही बैलांची सांगड होत नव्हती !! पुढे मागे होत होते !! बैल कसे सारखे आणि चौखूर पळाले पाहिजेत !! दोघांच्याही उड्या सारख्या पडल्या पाहिजेत !! मग कुणाची टाप लागलीय बाजू मारायची !! अहो जनावर पण लय शानी असत्यात !!
ही होती बैलगाडीची शर्यत!! आम्ही ती जिंकली होती !!
जस घर आलं तस मला उद्या आता भाऊ काय करतील ह्या विचाराने मी संजूला काहीही बोलू नकोस सांगून चूप चाप झोपलो व दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो !!
पाचलला एकच बातमी.... शिरुकाकांची जोडी एकदा बघाच !! काय जोडी आहे !!
आणि बंड्या तेलंग, हसन , शयाम पाथरे इतर मी शाळेत असताना घरी जोडी बघायला येऊन गेले. आणि सगळा प्रताप हसन ने भाऊंना सांगितला आणि मामीनेही तो ऐकला !!
रात्री जेवताना मामी म्हणाली काल कसे काय जाऊन आलात काही बोलला नाहीस !!
माझ्या पोटात खड्डाच पडला आणि मी फक्त भाऊंकडे पाहिलं !!
ते म्हणाले अरे !! एकदा गाडी बाजू मारून पुढे घेतली की मागे काय झालं बघायचं नाही !! एकदा असच आबा वायकुळास धामणपी पासून पाचलपर्यंत धुरळा खायला लावला होता मी !! रायपटणच्या भिकू गांगणाकडून मन्सूर आणि तिसकूड ( मारकूटा ) सागर ची जोडी मीच घेतली होती गाडीस त्यावेळी. आणि रामचंद्र पडवळ होता गाडीवर !! त्याला म्हटलं तू मागे बस आणि ह्या आब्यास दाखवतो जरा कोठारवाल्यांचं पाणी काय आहे ते!!!
रात्रीच जेवण पोट फुटेपर्यंत जेवलो त्यावेळी !!!😀😀😀
अनंत प्रभुदेसाई.

No comments:
Post a Comment