*इनसानियात*
कालच्या पोस्टमधील वाक्य मनात घर करू राहील आहे .
"साहेब माणुसकी सोडली नाही आम्ही अजून '"
काहीसं असंच आम्हालाही एकाने सुनावलं होत एकदा !!!
ही गोष्ट साधारण 15 20 वर्षपूर्वीची.
दिप्तीच्या KEM मधलं शेवटचं वर्ष असावं. रात्री 11 , 11.30 च्या सुमारास दादा दीप्ती व मी कारने तिला परळ ला सोडायला निघालो .रात्रीची वेळ असल्यामुळे कदाचित दादाने आयत्यावेळी मला बरोबर घेतलं असावं.
सायन circle पर्यंत पोचेपर्यंत 12 12.30 वाजले व त्याचवेळी गाडीचा एक tyre puncture झाला व ना आम्ही पुढे जाऊ शकत होतो ना मागे .रस्त्यावर मिट्ट काळोख . इकडे हॉस्टेल बंद व्हायची वेळ त्यामुळे दीप्ती अस्वस्थ . पुढे तिला सोडून यायचं तर गाडी कुठे ठेवायची . रस्त्यावर भरधाव वेगाने गाड्या जात होत्या ! काहीही सुचत नव्हतं . गाडी चलवण्यापलीकडे दादाला tyre बदलणं वगैरे जमण कठीणच!! रस्त्यावर एकही माणूस नाही!!
तरी सुदधा डीकी उघडून पाना काढून आम्ही tyre बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो !!
आम्हला puncture झालेल्या tyre चे nut सुद्धा काढणं मुश्किल होतं होत! करणं गाडीला jack लावणंच जमत नव्हतं !!
थोड्यावेळात एक टॅक्सी headlight on करून आमच्या गाडीच्या बरोबर मागे येऊन थांबली !! मनात हजार शंका !!
आमचे केविलवाणे प्रयत्न पाहून तो धिप्पाड मुस्लिम पठाण ड्राइवर टॉक्सितून उतरला , आमच्यापाशी आला आणि काहीही न बोलता परत त्याच्या टॉक्सिपाशी गेला !! त्याच रूप पाहून च मनात चरर झालं !
त्याने त्याच्या टॉक्सितला जॅक , पाना वगैरे हत्यार काढली आणि आमच्यापाशी आला आणि "बाबूजी ; बाजू हो जावं " अस दणदणीत त्याच्या रांगड्या भाषेत आम्हाला ठणकावल !!
आता हा किती पैसे मागेल किंवा पूढे काय सांगेल या विचाराने आम्ही गर्भगळीत !!
दोन मिनिटात त्याने त्याच्या जॅक ने गाडी उचलली ! जे nut हर प्रयत्नाने निघत नव्हते ते चक्क एक हातानेच पाना लावून काढले . "स्टेपनी है क्या! " नशिबाने होती . डिकीतली स्टेपनी एका हाताने बाहेर घेतली आणि लावली , nut डोळ्याचं पात लवेपर्यंतच्या वेळात फिट केलं !!
"अभि हो गया ." त्याने त्याच सामान उचललं आणि टॉक्सित जाऊन बसला !
आता दादा आणि मी एकमेकांकडे पाहत होतो. दादा ने 300 रुपये माझ्याकडे दिले व त्याला द्यायला सांगितले.
मधल्यावेळात त्याची टॅक्सी आमच्या गाडीच्या अगदी जवळ आणून त्याने उभी केली होती !
" आपका जॅक काम का नाहीं है बाबूजी हमरे जैसा ले लो . किंमत जादा नाही 100 रुपये मीलेगा चोर बाजार मे वो रखो गाडीमे ."
मी 300 रुपये त्याच्या हातावर ठेवण्यासाठी माझा हात पुढे केला .
त्या पैशांकडे पाहून त्याने एक तुच्छतेच स्मित दिल आणि
" इन्सनीयत की चीज अभिभी जिंगमे बाकी है साहब ''
अस बोलून त्याने टॉक्सिचा axilator असा काय दाबला की दोन सेकंदात ती टॅक्सी दिसेनाशी झाली.
300 रुपये माझ्या हातात तसेच पडून होते!
मुकाटपणे दादाने गाडी सुरू केली . आम्ही कुणीही कुणाशीच पाच मिनिटं बोलूच शकलो नाही !
एकच गोष्ट लक्षात राहिली !!
*"इनसानीयतकी चीज अभिभी जिंदगीमे बाकी है."*
सायन वरून त्या तिथून उर्वरित आयुष्यात खूपवेळा जावं लागलं , लागतंय !!! प्रत्येक वेळी स्मरण होतच !!!!
*इनसानियात की चीज अभिभी जिंदगीमे बाकी है !*
अनंत प्रभुदेसाई

No comments:
Post a Comment