Wednesday, 11 December 2019
आमच्या मामीच साक्षात लक्ष्मी पूजन !!!!
Thursday, 3 October 2019
माधव
*माधव*
माधव बद्दल जे काही लिहीन ते थोडेच आहे. एवढेच म्हणेन सर्वार्थाने हा माझा गुरु , कोणतीही गोष्ट असू दे , मला cycle चालवायला शिकवण्यापासून , कॉलेज admisiioncha माझा फॉर्म भरणे, कारण सांगायला हरकत नाही SSC झालेल्या मला तो इंग्लिश मधील फॉर्म पूर्णपणे वाचतही येत नव्हता. ( आता सुद्धा फार काही सुधारणा नाही हे तुम्ही समजला असालच) तर तो फॉर्म माझ्यावतीने भरून मॅक्सि ऍडमिशन मधवने ठाणा कॉलेज मध्ये घेऊन दिली. त्यावेळी Prof.Krishnan नि माधवला विचारलं सुद्धा 'क्या ऍडमिशन आपको लेना है क्या? ' मधवने माझ्याकडे बोट दाखवले . तो उंको फॉर्म भारने दो। काय सांगणार त्याला फॉर्म वाचताही येत नाही म्हणून. कशी बसजी मी फक्त सही करून ऍडमिशन झाली. प्रॉब्लेम इथेच संपते तर मग काय. मला रेल्वे ने डोंबिवलीहून ठाण्याला जयचपण यानेच शिकवलं!! नंतर आम्ही बाळदादाच्या clinik मध्ये रात्री अभ्यास काय केला, फाटाक्यांचा business काय केला, रात्रीचे गिरगाव ,दादर ला संपूर्ण रात्र गणपतीचे कर्यक्रम काय पहिले, एकाच दिवशी 9ते 12, 12ते3 & 3 ते 6 असे सलग अख्खा दिवस सिनेमा काय पहिले, नाटकाचं तिकीट विकून हॉटेलिंग काय केलं, माझं इकॉनॉमिक्स च पुस्तक घेऊन प्रत्येक प्रकरणाचा माझा अभ्यास किती झालाय याची माधवने खात्रीपण करून घेतली. अशप्रकारे B.COM. मॅक्सयकडून करून घेतलं म्हणण योग्य ठरेल. फार काय मला पहिली नोकरी लागली त्या कंपनी मध्ये तो माझ्या interview ला अल्लाच पण इथे मी पगार किती मागावा हे सुद्धा त्यानेच मला सांगितलं!!! नंतर share मार्केटचे धडे पण मी त्याच्याकडूनच घेतले!!! आमच्या कॉलेज जीवनात नंदा असेल तिकडेच माधव किंवा माधव तिथे नंदा अस समीकरण झालं . तस थोडं ते इतरांच्या द्रीष्टीनें त्रासदायकाही झालं असेल पण आमची मैत्री कमी झाली नाही. नोकरीच्या निमित्त्यानं मला पार्ल्याला जावं लागलं, नंतर लग्न व नंतर ठाणे येथे वास्तव्य असा माझा प्रवास चालू आहे ज्यामध्ये एका बावळट माणसाला माधव ने इथपर्यंत घडवलं आहे. आज त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त्यानं पूर्व स्मृती जाग्या झाल्या. या प्रवासाला मधवची तसेच माझीही सर्व भावंडं साक्षी आहेत, इतरांनाही त्याची कल्पना असेल किंवा नसेल. माधव तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुला सुयश लाभो, तसेच तुम्हा उभयतांना चांगलं आरोग्य, ऐश्वर्य लाभो ह्याच माझ्या शुभेच्छा & इशवरचर्नी प्रार्थना.
नंदा.
Tuesday, 1 October 2019
सिंधूमावशी
*सिंधूमावशी*
सिंधुमावशीची सेवा भाग्यश्री , जोशी, आपटे काका , अपूर्व & संजय यांनी खूपच चांगल्या प्रकारे केली.
तिला झालेला👌 आजार हा तसा बरा न होणारा मानला जतो तरीसुद्धा तिने ज्या धैर्याने त्याला तोंड दिले ते तर वादातीतच न्म्हणावे लागेल.
या वेळी भाग्यश्री व जोशी यांनी सांगितलेल्या काही गोष्टी खूपच चांगल्या वाटल्या म्हणून त्यांचा उल्लेख करावा अस वाटत.
मावशीला cancer आहे याची तिला तसेच आपटे काका याना त्यांनी धैर्याने जाणीव करून दिली.
तिला द्यायची ट्रीटमेंट म्हणजे radiation वगैरे मावशीला सांगूनच दिली.
डॉक्टरांचं म्हणण अगदी उघडपणे घरातील सर्व म्हणजे मावशी आपटेकाका असे सर्वजण मिळून चर्चा करीत असत, कोणतीही गोष्ट सुरवातीपासूनच उघड उघडपणे ठरवली जायची परिणाम म्हणजे आपटे काकाना & मावशीलाही काही गोष्टी ची माहिती स्पष्टपणे मिळाली
मावशीच्या सर्व इच्छा कुणाला काही द्यायचं वगैरे होत ते तिच्या इच्छेप्रमाणे तिला करता आलं.
अभिजित ला भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती तीही पूर्ण झाली!! ( अभीजीतला लहनपणी तीन सांभाळल आहे & तो तर तिला आपटे आईच म्हणतो )
सर्वात महत्वाचं जोशी यांनी केलेल्या सेवेची तुलना काशाबरोबरही करता येणार नाही !! त्याची तुलना होऊच शकत नाही !!! कर्तव्य म्हणजे काय ते कस पार पडायचं याच ह्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही!!! त्यांना तितक्याच तोलामोलाची साथ भाग्यश्री & अपूर्वनेही दिली.
आपटेकाका , जोशी , भाग्यश्री ,अपूर्व , संजय याना लाख लाझ सलाम !!!
दत्तामामा
*दत्तामामा*
दत्तामामा 83 वर्षांचा व सुमतीमामी 72 वर्षांची झाली. खरं नाही वाटत.
वेळ कोणतीही असो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे इतक्या हसत मुखाने स्वागत करणारी आणि फक्त स्वागत नाही तर त्यांची सर्वतोपरी बडदास्त ठेवणारे हे आमचे मामा मामी.
मामाशी माझी खास दोस्ती होती. अपार कष्ट करून देसायांची डेअरी , बैलगाडी, माडीवाल घर झालं पाहिजे अशी त्याची रास्त स्वप्न होती ती बऱ्याच प्रमाणात पुरीही झाली. "माझ्या मामाची रंगीत गाडी हो" अस म्हणत त्याच्या गाडीतून फिरण्यासाठी मी खूप आतुर होतो पण मी मुंबईला आल्यामुळे मला ते शक्य झालं नाहि आणि आता ते दिवस परत येणहि अशक्य .
मामिला फुलांची खूप आवड आहे. ती इतकी गोरी कि फुल चांगली कि मामी!! अस मला अजूनही वाटत!! ह्या मामीला सहसा पुरुष करतात यी सर्व काम म्हणजे झाडावर चढण, जमीनीला चोप काढणं अशी सर्व काम करता येतात याच मला अजूनही आश्चर्य व कौतुक वाटत.
मामी बरोबर तळीच्या माळावर गुर चरायला नेतानाच्या दिवसांची मला अजूनही आठवण आहे. रगाड्यामधे झाडावर चढून जांभळं, जांभी पाडून दिल्याचं चांगलं आठवत. असो. ह्या सर्व ठिकाणी मामी बरोबर जाण्याची माझी इच्छा जेंव्हा तिच्याजवळ व्यक्त केली तेव्हा आता retired होतोयस ना, राहायला ये 4 दिवस मग जाऊ , अस म्हणाली.
गेल्याच वर्षी होळीच्या वेळी दादा,वाहिनी, मंदा, अनुजा, मी ,अकुल, श्रेया असे सर्वजण मामा मामीं ना भेटून आलो. परत निघताना मामा मामीला सर्वां प्रमाणेच परंतु सगळ्यात शेवटी नमस्कार केला तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यातून येणार पाणी खूप काही सांगून गेलं. आमची गाडी अकुल चालवत होता . त्यानं ती थांबवली आणि तो श्रेयाला म्हणाला विचर आता....
"बाबा तूम्ही नमस्कार केल्यावरच त्यांना इतकं का वाईट वाटलं???" आजही माझ्याकडे या प्रशनाच उत्तर नाही!!!!
नंदा प्रभुदेसाई
एक वादळ शांत झालं
*एक वादळ शांत झालं*
कासारड्याचे दत्ता देसाई ही काय चीज होती हे सांगून समजणं जर कठीणच ...
ज्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल ते धन्य ...
कासारड्याच्या एका कोपऱ्यात असलेलं ब्राह्मणाच हे एकमेव घर ...आजूबाजूची सर्व वस्तीही पाटील लोकांची जे स्वतःच इतके मानी की या देसायाना कोंडीत पकडायला सदैव तयार ...
सहादेव पाटील हे त्यापैकीच एक...
नाना क्लुप्त्या युक्त्या करून , माझा भाऊ सैन्यात आहे, माझ्याकडे स्वसंरक्षणासाठी त्याने दिलेली बंदूक आहे , विमानातून तो आमच्या घरावर लक्ष ठेऊन असतो असे एक ना अनेक गोष्टी सांगणं ही फक्त आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड होती ...
सकाळी सकाळी कमरेला आकडी बांधून त्यात कोयता अडकवून उर फुटेपर्यंत गड्यांच्या बरोबरीने केलेलं काम अंगावर शहारे आणायचं. एकच इशारा दत्ता देसाई द्यायचा , तुम्ही जर मदतीला नाही आलात तर देसाई थांबत नाहीत तर त्या कामचंच उलटं की पालट करून टाकतात ....तेसुद्धा स्वतः व बायकोला मदतीला घेऊन......
रंगाड्यातील कलम लावणं , खालच्या वहाळातून घागरीने या दोन नवरा बायकोनि कसं पाणी घालून त्या झाडांना वाढवलं असेल ते फक्त त्या झाडांनाच माहीत ...
आंबे चोरून नेऊ नयेत म्हणून त्या रंगाड्यात रात्री एकट्यानं राहायचं , मोठमोठयाने पोवाडे , आरत्या , भजन जे काय येईल ते म्हणायचं ......
फक्त जगण्यासाठीची धडपड ...
शेतीची काम, जोत धरण, भात लावणं कधी आपलं जोत इतरांकडे नेणं व त्यांच आपल्याकडे बोलवण , त्यांच्या मदतीने आपलंही काम करून घेणं, केवळ मन मारून केलेली धडपड ...
दुधाचा व्यवसाय ... काय मेहनत ...पहाटे 4 वाजल्यापासून उठायचं , म्हशींना पेंड ,त्यांच खाण, पाणी, गवत पुन्हा त्या दूधाच्या किटल्या घेऊन तरळ्याला धावत जायचं , परत धाव धाव यायचं , शेतीच काम, रगाड्यात जायचं, आला गेला माणसांचं हसत मुखाने स्वागत , इतकंच नाही तर मे महिन्यात मुलांबरोबर खाम्ब खाम्ब खांबोळ्या पण खेळायचं हे सर्व ही दोन माणस कस काय करत असतील ...
केवक धडपड ...
रात्री हा माणूस जेव्हा झोपायचा तेव्हा
" बाळ्या , अरे जरा माझे पाय तुडवरे...नुसती आग आग होतेय ...."
" मामा तू पुरे म्हणतच नाहीस " मी
आज कळतंय माणसासारखी नाही तर गुरांसारखी मेहनत करणारा हा माणूस त्यावेळी झोपेत नव्हे तर शुद्धीतच नसायचा ....
आज हे वादळ शमलय , चिरनिद्रेत गेलंय , आता पुन्हा कधीही सांगणार नाही ....
"बाळ्या माझे पाय तुडवरे जरा ....."
अनंत प्रभुदेसाई.
बाबी मेस्त्री
*बाबी मेस्त्री*
मंडळी तळवडे गाव , त्यविषयी काय आणि किती सांगावं. अतिशय समृद्ध, तसेच या गावात एकापेकशा एक असे कलाकार लोक होऊन गेले. त्यांच्या कला, स्वभाव त्यांचं राहाणीमान हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो .
तर असाच बाबी मेस्त्री म्हणजे बाबी सुतार हा त्यापैकी एक ...
हा माझ्या वडिलांना म्हणजे भाऊंना सिनियर असावा कारण फार थोडे लोक भाऊंना एकेरी नावाने हाक मारायचे त्यात हा बाबी "शिरुकाका, काय सकाली सकाली चाय प्याला माझ्याकडे आलास की काय "
अस विचारायचा...
" चल आलोच शालेत बस तवसर..." बाबीने सागितलं..( शाळा म्हणजे सुतार काम करण्याची घरापासूनची वेगळी झोपडी )
बाबी चा पेहराव सुद्धा तसा हटके असायचा . पांढर धोतर ( म्हणजे त्याचा ओरिजिनल रंग) , फुल बाह्यांचा गंजी , वरती कब्जा ( ह्याला वर्ती खाली दोन दोन व आतल्या दोन्ही बाजूना एक एक असे एकूण सहा खिसे असणार खाकी रंगाचं जाकीट) , त्यातला एका खिशात 4-5 विड्या आणि दुसऱ्यात खास चकचकीत लायटर हमखास असायचा , कारण बाबीच अग्निहोत्र कायम प्रज्वलीत असायचं , डोक्याला सफेद ( म्हणजे हा रंग आम्हालाच ओळखता यायचा )पण घामाने वेलबुट्टी तयार झालेली टोपी , गळ्यात जानव आणि पायात चामडयाच्या चपला , एकदम सडपातळ पण 6 फूट उंच अशी ही मूर्ती !!!
याचा व्यवसाय म्हणजे बंदुकी दुरुस्त करणे . तस लायसन त्याच्याकडे होतं. कधीही रात्री दिवसा बाबी बंदुकीची लोखंडी नळी घासताना किंवा बंदुकीचा घोडा एक डोळा बारीक करून तयार करताना दिसायचा . पण हो संध्याकाळी हा नेहमी पाचलला (शेजारचच गाव जरा सुधारलेलं , तिथे ST थांबायची ) न चुकता जाणार , लब्दे (एक व्यापारी) यांच्या दुकानात बसून 3 - ४ विड्या प्यायच्या व परत घरी यायचं , या नित्यक्रमात कधीही फरक पडत नसे.
मंडळी आता सांगायला हरकत नाही हा बाबी बंदुका तयार करण्यात माहीर होता , नव्हे त्याने तयार केलेल्या बंदुकीना घाटावर इतकी मागणी होती की बस , रोज 3-4 बंदुकी विकल्या जायच्या (without licence) .
एकदा पोलिसांनी धाड टाकली व बाबीला रंगे हात पकडलं व हातात बिड्या ठोकून अटक करून राजपुरला घेऊन जायची तयारी केली आणि " बाबी सुतारास बिड्या घालून पोलीसानी अटक केली " ही बातमी गावात , पाचलला सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली ...
आता बाबी हा तसा गावचा सुतार त्याला बिड्या ठोकून गावातून नेणार म्हणजे गावची अब्रू जाणार !!!
भाऊंना हे समजलं त्यांनी दुकानं बंद केलं व दुपारच जेवण न जेवताच मामीला "जरा जाऊन येतो " म्हणून सांगितलं (कुठे जाताय !! म्हणून विचारायची मामीची प्राज्ञा नव्हतीच, करण त्यांचा चेहराच तसा झाला होता )
देव कुठे पावला माहीत नाही , पण
"त्या बाबल्या सुतारास अटक झालीय , जरा बघतो जाऊन कोण इन्स्पेक्टर आहे तो ....."
भाऊंनी सांगितलं ....
बाबीच घर गावच्या लोकांनी तुडुंब भरलं होत व फणसळकर इन्स्पेक्टर बिड्या व दोरखंड घेऊन अटक करणार इतक्यात भाऊ आले व हे फणसळकर ... ब्राह्मण माणूस .... भाऊंना ओळखत होते ते एकदम उठून उभे राहिले आणि "शिरूभाऊ !!! तुम्ही कुठे चाललात" म्हणाले .
भाऊंना बघितल्यावर बाबीच्या डोळ्यात पाणी आलं व बाबीची बायको भाऊंच्या पायावर डोकं ठेऊन तुम्ही आता आम्हाला वाचवा अस म्हणून तीन हंबरडा फोडला ....
भाऊंनी प्रथम सगळ्या लोकांना "अरे .भ...व्यानो तुम्ही इथे काय तमाशा बघताय काय , घरदार नाही तुम्हांस, चला चालायला लागा बघू "
अस म्हणून सगळी गर्दी हटवली .
भाऊंनी फणसळकराना बाजूला घेतलं व घरी माघरणीने दोन जेवणाची ताट वाडलीयेत ती टाकून आलोय , तुम्ही जेवलात तरच मी जेवणार अस सांगितलं व त्यांना बरोबर घेऊनच ते निघाले....
पण जाताना फणसळकरानी दोन पोलिसांना बाबीवर लक्ष ठेवा अस बजावलं ...
जेवण झाल्यावर "शिरूभाऊ !!! तुम्ही उशीर केलात आता काहीही करता येणार नाही , अटक ही होणारच" अस निक्षून सांगितलं .....
भाऊंनी विचार केला
" फणसळकर अत्ता 4 च्या गाडीने तुम्ही राजपुरला जा, बाबी तूमच्याबरोबर येईल पण बिड्या नाही घालायच्या, तुम्ही म्हणाल तिथे , तुमच्या मागोमाग तो येईल , जबाबदारी माझी..."
फणसळकरानी मान्य केलं व अटक टळली...
दुसऱ्या दवशी सकाळी पहिल्या ST ने भाऊनि राजापूरच कोर्ट गाठलं , बाबीला झालेला दंड रुपये 500 , भरला ,
पण मंडळी रुपये 1000 स्वतः भरून बाबीला बंदुका दुरुस्त करण्याचं लायसन मिळवून दिलं व त्याला घेऊनच हे दोघेही तळवड्याला संध्याकाळच्या आत हजर झाले .....
ज्याला अटक होणार होती तो लायसन घेऊन मोठ्या दिमाखात गावात परतला होता .....
लोक हळू हळु बोलायला लागले होतें
" शिरुकाकांच्या गावचा सुतार हाय तो . . ...
उगाच नाय कोठारवाले धंदा टाकून सकाळी सकाळी राजापुरास धावले ..."
असा हा बाबी सुतार .....
मंडळी ह्या माणसाच्या अंगात अंगात इतक्या कला होत्या की काय काय सांगावं ...
आमच्या तळवड्याच्या दुकानाच्या इमारती समोर मोठी मांडवी बांधायच काम मुरातले (एक गाव, व त्या गावाच्या नावावरूनच प्रसिद्ध असणारे ) सुतार करीत होते. ही मांडवी किती मोठी होती , तर समोरा समोर 13 , 12सागवानी खांब, (लांबी) प्रत्येक दोन खांबामध्ये एका मोठ्या गड्याचे मध्ये उभे राहून दोन खांबांना हात पोचले नाही पाहिजेत इतकं अंतर , (मंडळी समजून घ्या!!! ही गावची मापं आणि भाषा आहे ती तशीच सांगण्यात मजा आहे )आणि रुंदी 3 गाड्यांच्या हाताला हात भीडणार (touch)नाही इतकी आणि वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही बाजूला भिंत नाही , चारही बाजूने ही मांडवी उघडी !!! (भव्यतेची जाणीव व्हावी )
आणि म्हणूनच मुरचे प्रसिद्ध सुतार ती बांधत होते !!
कोकणातल्या परंपरा काहीही झालं तरी तेथील लोक मोडत नाहीत.
सकाळी सकाळी भाऊ याच कारणासाठी बाबी सुताराकडे आले होते . कोणतंही घराचं बाधकाम असो गावच्या सुताराचा मान झालाच पाहिजे !! तिथे केल्या जाणाऱ्या पूजेची धोतर जोडी, मानाचा नारळ आणि दकशीणेच पाकीट यावर हक्क गावच्या सुतारांचाच असतो आणि तो त्यांना द्यायचाच असतो इतकंच नाही तर यजमानाने हे काम करण्यास तुझी सहमती आहेना अस विचारून काम पूर्ण करून घ्यायची जवाबदारी तू घे व तुझी परवानगी असेल तरच घराच्या सरास (लाकडी खांब) कुर्हाड लाव व कामास सुरवात कर !! "
असं यजमानाने आदरपूर्वक सांगायचं असत !!!
अशाप्रकरे सर्व सोपसकर झाले व मुरातले 15 सुतार दोन महिने सतत काम करून मांडावी उभी राहिली . एकसमोर एक असे 24 खांब , एकदम सरळ रेषेत , मधलं भव्य अंतर . गावातील आजूबाजूचे लोक इमारत बघायला यायचे. (मंडळी ही गोष्ट साधारण पणे 100 वर्षांपूरवीची आहे) काही जाणते लोक इमारतीची लांबि किती, रुंदी किती, कौल किती लागतील असे वेगवेगळे तर्क करून जायचे !!!
थोड्याच दिवसात इमारतिचा आयताकृती ढाचा तयार झाला , आढ (छता चा मध्य भाग ) ठेवलं गेलं ,आंब्याचं टाळा, कोव्हाळा बांधला आणि मुरच्या सुतारानी आनंदाने बंदुकीने चार बार हवेत काढले !! आणि कौल घालण्यासाठी वासे (छतापासूनचे supportr) लावले गेले. संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी कौंल घालण्यासाठी काम थांबलं !!
........
सकाळी सुतार कामावर आले मात्र आणि आपआपसात कुजूबायला लागले . एकमेकांशी बोलून इमारतीच्या चारही बाजूने फेऱ्या मारू लागले. पण कामाला सुरुवात करिनात , काय झालं, काय झालं...
कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता ...
साधारण माणसाच्या काही लकशात येईना !!
इमारत पूर्ण होत आली आणि आता काय झालं !!! सगळेच जण बुचकळ्यात पडले !!
अस काहीतरी घडलं होतं !! पण कोणीही सांगत नव्हतं !!
शेवटी त्या 15 सुतारांपैकी एकजण भाऊंना म्हणाला ...
"काका येक गोष्ट झाली बघा !! काय ध्येनात येत नाय , आमची चूक पदरात घ्या, पण आमची अब्रू राखा , पाया पडतो तुमच्या !!"
" मेस्त्री , काय झालं ते तर सांगा !! " भाऊ
" काका , कस बोलू !! वाचा नाय माझी !!" मेस्त्री
" मेस्त्री, काय झालं सांगा" भाऊ
..........
आता सर्व काम झाल्यावर हा प्रॉब्लेम कसा सुधारायचा ....
भाऊ सकळी लवकर उठले आणि थेट त्यांनी बाबी सुतार च घर गाठलं !! आणि बाबीला बरोबर घेऊनच ते घरी आले !!
" वयनि , काय चांगली दुधाची चाय कर आणि मला दे "
परस्थिती अशी की दुधाचा काय सोन्याचा चहा सुद्धा दिला असता ...मामीने.
बाबीने चहा घेतला , आणि
"शिरुकाका खय गेला , दुकान उघड , मला दोन विड्या दे !! " बाबी
एक विडी बाबीने तिथेच शिलगावली व दूसरी त्या विडीनेच पेटवून चला आता बघूया मुरकऱ्यानि कस काय काम केलंय ते अस म्हणून स्वारी मांडवी पर्यंत आली .....
" अरे वो शेंताराम , काटकोन्या घे इकडं , !!!
बाबीने एका बाजूच्या 3-४ खांबांना कटकोण्या लावला , काहितरी अंदाज बांधला आणि खुशीत बिडी शिलगावली....
आता दुसऱ्या बाजूवर नजर टाकली , काटकोन्या गंजीत अडकवला , जाकीट काढलं, धोतराचा घट्ट कासोटा उभ्या उभ्याच मारला आणि टुणकन उडी मारून एकदम छतावर चढला गडी...
वरून नजर नुसती सगळीकडे भिरभिरत होति , जे पाहिजे ते नजरेत पकडलं आणि स्वारी खाली उतरली !!!
आता बाबीच्या आजू बाजूला ते सगळे 15 सुतार, घरातील 3, 4 पुरुष , मूल बाळ अशी गर्दी जमली होती . सुतारांचे चेहरे बघण्यासारखे केविलवाणे झाले होते तर घरचे पुरुष मुलांवर डाफरत होते !!!
बाबी उठला ...आणि आता हा काय सांगतो .... इकडे सर्वजण अगदी कानात प्राण आणून बघत होतें...
"शिरुकाका इकडे ये , उद्या राजापुरास जा आणि 48 , एक इंच जाडीच्या आणि 6 फूट लांबीच्या लोखंडी पट्ट्याआणि 100 nut bolts घेऊन ये !! " बाबीने फर्मावल ...
मंडळी काय झालं होतं तर सम्पूर्ण इमारत 90% तयार झाली होति आणी वरती कौंल घालण्यापूर्वी ती दोन बाजूना झुकली होती....
मंडळी ह्या पट्ट्या आणल्यावर त्या पट्ट्याची दोन्ही टोकं , इमारत ज्या बाजूला झुकली होती त्याच्या विरुद्ध बाजूला पिळून , उभ्या केलेल्या त्याच खांबांवर nut बोल्ट च्या साह्याने एकदम घट्ट बसवल्या बाबीने . मोठ्या पान्यायाने nut बसवते वेळी झुकलेल्या बाजूने बरोबर काटकोन होतोयना याची खात्री शांताराममेस्त्रीला करायला सांगितली ...आणि बाबी मेस्त्री आपल्याच खुशीत इमारतीच्या आढ्या वरून खाली उतरला ....
" शेंताराम, आतां बघ बारी काम कस झोकात झालं ते !! आता धा (10) गडी वर चढा आणि मगलूर चढवा बघतोच मांडवी खयच्या दिशेस बघतेय ती... ...अरे साला पुढची 100 वर्स जर खांब हलला तर बाबी सुताराची अवलाद नाय सांगणार !! मगे तुमि बी हाय आणि जगलो वाचलो तर मी बी हाय !!"
मुरच्या सुतारानी भीत भीत बाबी मेस्त्रीला मोबदला विचारला .....
त्यावर बाबीने दिलेलं उत्तर .....
"अरे मेस्त्रीनो !!!! माझ्या हातात जेव्हा बेड्या पडायची वेळ आली होति तेव्हा शीरुकाकास मी बोलावया नव्हतो गेलो .......
हरामखोर.. सगळा गाव हसत होता मला पण एकटा शिरुकाका माझ्यासाठी धंदा बंद करून राजापूर पर्यंत धावला , खिशात दिडकी सुदधा नव्हती माझ्या त्या येळेस !!!
माझा मोबदला विचारताय ... तो सुद्दा काम झाल्यावर .... अरे वयनीच्या हातचा एक कप चा , तो सुदधा काम होन्या अगोदरच मी घेतलाय आता राहिली बिडी ती शिरुकाका देईलच ...."
मंडळी आजही ही मांडवी आणि तिचे खांब आणि त्याने बसवलेल्या त्या लोखंडी पट्ट्या बाबी सुताराचा शब्द खरा करण्यासाठी जश्याच्या तशा आहेत, बाकी इमारत ढासळली आहे पण खांब एकदम काटकोनात उभे आहेत ....याच मांडावीत काय काय सोहळे पार। पडले त्याविषयी पुन्हा कधीतरी .....
याला म्हणतात बाबी मेस्त्रीं!! तो तळवडे गाव त्याची ती कला व त्यावरचा विश्वास !!!
शतशः सलाम !!!
या गावच्या सत्य घटना, गोष्टि ऐकण्याच , अनुभवण्याचा काही अंशी भाग्य मला लाभलं म्हणून मीही भाग्यवंतच नाही का !!!
अनंत प्रभुदेसाई.
Monday, 30 September 2019
अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….
*अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….*
आपल्या घरी होत असलेल्या अg gfनंत पूजेचा वारसा खूप मोठा आहे. ही पूजा म्हणजे एक सोहळाच आहे.
यानिमित्याने गावातील लोक आपल्या घरी होणारी भाजी म्हणजे पडवळ, भोपळा, काकडी अस काहीही आनंदने प्रसाद म्हणून आणून देत असत, तर काही वेगवेगळी फुल, पत्री, कमळ अस जे शक्य असेल ते आणून देत.
पूजेला भाऊ व मामी बसायचे. नाना सप्रे यथासांग पूजा सांगायचे.अंबुताई म्हणजे नानांच्या सौ , सवाष्ण व जेवणासाठी मामीला मदत म्हणून अगदी सकाळपासूनच हजर असायच्या .
घरातील 25 -30 माणसं, 4-5 गडी, फुलं - भाजी आणून दिलेलें, आयत्या वेळी प्रसादासाठी आलेले असे सुमारे 80 -90 लोक जेवायला सहज असायचे.
अनंत पूजेसाठी लागणारे 14 प्रकारच्या भाज्या, कोशिंबरी तर असायचाच शिवाय वडे , घारगे व मोदक असायचे. जेवणावळी (पंगती ) समपेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजयचे.
आमचया गणपतीचं विसर्जन अंनंताच्या दुसऱ्या दिवशी व्हायचं.
नंतर रात्रीची तयारी . रात्री गावातील सर्व ब्राह्मण मंडळींला आरत्या म्हणण्यासाठी बोलावल जायचं. आरत्या म्हणणारे एक्स्पर्ट आवर्जून आजू बाजूच्या गावातून यायचे.
बाळ्याकाका काय माणूस हो .... एकदम प्रसन्न व हसरा चेहरा .... त्यातच त्यांनी तंबाखू , चुना , कात, सुपारीच पान खाल्ल की तोंड एकदम लाले लाल व्हायचं , व चेहरा आणखीनच खुलून दिसायचा. ढोलकी अशी वाजवत की बाजूचा चकवा (मोठ्या झान्जा) वाजवणार्या माणसाचा ठोका चुकला तर ढोलकी वाजवण्याच्या काठीचा फटका तुमच्या हातावर बसला म्हणून समजा...
"आरत्या म्हणताना बाळ्या काकांची मी साथ केलीय " अस काही लोक अभिमानाने सांगायचे ....
मंडळी जेव्हा मी या बाळ्याकाकाना पाहिलं तेंव्हा त्यांचं वय 78 ते 80 असावं. मस्त गोरे गोरे आजोबा, चेहरा हास्याने एकदम फुललेला , स्वच्छ धोतर, अंगात बंडी व त्यावर निळ्या रंगाच जाकीट.
आरत्या म्हणणारया काही लोकांची वैशिष्ट्य अशी...
शांताराम अण्णा झान्जा वाजवणार, सगळ्यांना सांभाळून घेणार.
हरिभाऊ व बापुकाका पत्की ढोलकी वजवणार. बापुकाका थोडेसे मिस्कील स्वभावाचे .
"शीरुकाका ची आरत्या म्हणण्याची हौस दाणगी पण उभं राहून राहून माझे पाय तुटले , म्हटलं याला आता कुणीतरी आवरा "
अस म्हणायचे ...
हरिभाऊ व रघुभाऊ नवीन नवीन आरत्या म्हणणार ...
बाळ्याकाकाआजोबांना अजिबात ऐकू येत नसे पण हे इतके हौशी की कोठरातल्या आर्त्यांना आंब्यातून (गवाच नाव) याययाचेच. 80 वर्षाचे आजोबा 4 तास ढोलकी वाजवत उभे राहायचे. सर्व आरत्या त्यांना तोंड पाठ होत्या.
गंमत म्हणजे एकदा आरतीची सुरवात त्यांच्या कानात सांगितली (ऐकू येत नव्हतं ना) की संपूर्ण आरती आणि ढोलकी एकदम सुरात म्हणायचे आणि वाजवायचे .
कोठारात आरत्या जितक्या रंगतात तितक्या इतर कुठेच रंगत नाहींत अस लोक म्हणायचे व याचा सर्व कोठरवाल्याना अभिमान वाटावा ....
आरत्या झाल्यावर पोहे व कॉफी दिली जायची .
मंडळी त्या रात्रीच्या कॉफी ची चव अजूनही मी विसरलो नाहीये. मस्त जायफळ घालून आटवलेली कॉफी ....
आरत्या झाल्यावर सोंगट्या चा खेळ रंगायचा.
मांडवी विषयीं मी मागच्या एका लेखात लिहिलं आहेच .
तर या मांडवीत खेळल्या गेलेल्या सोंगट्या च्या एका डावा विषयी आता तुम्हाला ऐकवतोच ...
कोठारात न भूतो न भविष्यती असा तो खेळ त्यावर्षी खेळला गेला...
आनंतचतुर्दशीची ती रात्र. पाऊस थोडा फार पडत होता.. रात्रीचे 2 - 2.30 वाजले असतील आणि मांडवीत जाजम (मोठी सतरंजी) घातलं गेलं , सोंगट्या चा पट मांडला गेला , मधोमध बत्ती (petromax) ठेवली गेली आणि प्रत्येक बाजूचे 12 जण असे एकूण 48 गडी खेळायला बसले .
काय माहोल होता, यजमान (प्रभुदेसाई) पूर्व पश्चिम , घुगरे - सप्रे उत्तर दक्षिण , दान लावणारे बंडूकाका पिवळ्या सोंगट्या घेऊन तर त्यांचेच प्रतिस्पर्धी हरिभाऊनि काळ्या सोंगट्या घेतल्या.
प्रभुदेसाई सप्रे हिरव्या आणि तांबड्या सोंगट्या घेऊन खेळाला सुरवात झाली
हस्तिदंती पांढरे शुभ्र फासे, एकावर एक घासून असे टाकले जायचे की त्याचा कडकडाट व्हायचा व तो आवाजच त्या रात्री भयांण वाटायचा.
मंडळी लक्षात घ्या , 48 लोक खेळत होते , केवढा मस्त माहोल असेल ना ??
यामध्ये अगदी 80 वर्ष वय असलेल्या म्हातारयांपासून , 60 -70 वय असलेले सर्वजण होते. 48 खेळाडूंनी खेळला जाणारा हा एकमेव खेळ असावा.
मंडळी बडूकाकांविषयी आणि त्यांच्या सोंगट्याच्या खेळाच्या वेडा विषयी काय सांगावं. घरीं हा माणूस पट मांडायचा आणि चारही बाजुनी एकटाच खेळायचा ...
यजमानांपासून सुरवात म्हणून भाऊंनी फासे हातात घेतले आणि मनापासून डाव्या कानाजवळ नेऊन आवाज करून टाकले. एकच आरोळी उठली आणि आता यजमानांनी सुरवात तर केलीच आहे तर आता कोण जिंकतो बघूया, अशी आरोळी उठली. पटावरच्या दोन सोंगट्या बाहेर आल्या
अजून 11 जण खेळायचे बाकी होतें.
जर सगळ्या सोंगट्या बाहेर आल्या व सम्पूर्ण पट फिरून घरात (home) गेल्या तर खेळच संपला ...
पण तसं व्हायचं नव्हतं...
पुढच्या बाजूच्या पार्टीकडे आता फासे गेले ज्यात बंडूकाका एकपाय दुमडून बसले होते. त्यांनी पहिल्या भिडूच्या पाठीत धपाटा घातला आणि ओरडले "आठ पाहिजेत , उठून बस , फासे टाक... तू बोलशील तस दान फासा देईल ... सगळ्या सोगट्या बाहेर हव्यात माझ्या... आज ह्या सगळ्यांना दखवतोच , सोंगट्टयाचा डाव मीच जिंकणार " झालंही तसच ... पहिल्या 2 सोंगट्या ज्या यजमानांनी बाहेर काढला होत्या त्या बंडूकाकांनी मारल्या व आपल्या तीन सोंगट्याना चाल देऊन , पुढच्या भिडूना फासे दिले.
मंडळी लक्षात घ्या 48 जण खेळतायत पण पटावर फक्त 3 सोंगट्या..
आता सोंगट्याचे माहीर रघुकाकांच्या हातात फासे होते . त्यांनी त्यांचा इरादा सांगितला .... "अरे नाना बघतोस काय ..घे फासे आणि बोल 6 ... 8 आणि सक्रे सात ( एका फॅशयावर 6 व दुसऱ्यावर 1 रेजा , याला अस म्हणण्याची पद्धत) हवेत ...अरे ह्या बंड्याच्या तिन्ही सोंगट्या मारून , माझ्या दोन ना चाल नाही दिली तर साला पुन्हा सोंगट्या ना हात नाही लावणार ....
आतापर्यंत शांतपणे चालणारा खेळ हळू हळू रंगू लागला व वातावरण तापू ही लागलं ....
रघुभाऊच्या भिडूना हवं तसं दान पडलं आणि फासे रघुभाउंकडे आले.
त्यांनी एकदा फासे निरखले , बंडूभाऊंकडे रागाने तीरपी नजर टाकली , आणि फासे असे काय कानाजवळ नेऊन एकमेकांवर घासले की त्या फाशांचा येणारा आवाजच चमत्कारिक वाटला.
त्यांनी सकरे सात हवेत म्हणून फासे फेकले आणि सात पडताच बंडूकाकांच्या तीन्ही सोगट्या अशा काय बसल्या जागेवरूनच हणल्या की बंडूकाकांच्या अंगाचा तिळपापड झाला.
मंडळी 48 जण खेळतायत , आरडा ओरडा, एकमेकांच्या कुरापती इतक्या शिगेला पोचल्या की ज्याचे नाव ते ...
थोडं बांडूकाकां ह्या माणसा विषयी सांगितलंच पाहिजे..
बंडूकाका म्हणजे काय तगडा माणूस !!!
नाश्त्याला नाचणीच्या चार भाकरी , प्रत्येकी दोन भकरींच्या मध्ये लसणिच्या लाल तिखटाचा थर व वरती 200 ml शेंगडण्याच तेल फस्त करणारा हा माणूस..
" रघु , एकदा फासे माझ्याकडे येउ देत , तुम्हा सगळ्यांच्या सोंगट्या पटाबाहेर नाही काढल्या तर ह्या कोठरवाल्यांकडे शपथ घेतो की पुनः सोंगट्या हा विषय बंद..."
बंडूकाका
"अरे बंड्या , फुकट हवेत बार नको काढुस ,फासा बोलले पाहिजे फासा...." रघुभाऊ
आता वातावरण खेळ बाजूला राहून चिघळायला लागलं!!!
पण असं नाही झालं तर खेळ पण रंगत नाही ...
आता फासे बंडूकाकांच्या पार्टीकडे होते . पहिल्या दोघा तिघांना म्हणावं तस दान न पडल्यामुळे बंदुकाकांचा पारा चढला , त्यांनी फाशांना आपल्या मस्तकी लावलं आणि जोरजोरात कडकडाट करीत फासे टाकले .. आणि 8 घेतले..
पुन्हा 6 पडले ,
"हरी बघतोस काय उडव त्या सोंगट्या , आणि बोल किती हवेत , ह्या रघुची एकही सोंगटी मला पटावर दिसता कामा नये"
"अरे हे फासे काय तुझ्या रक्तात बुडवलेत काय "
इति रघुभाऊ
"तसं समज हवं तर पण आता बघच फासा काय बोलतो ते ..."
अस म्हणून बंडूभाऊनी फासे टाकले मात्र आणि काय आश्चर्य एक फासा चक्क उभा राहिला ....
बंडूभाऊनी एक सोंगटी हातात घेऊन फेकून रघुभाऊंच्या सोंगटीवर मारली, दुसरी घेतली आणि "अरे हरी , हांण ती सोंगटी... रघुच्या सगळ्या सोंगट्या मार ....
असं म्हणणार तोच
" कशी मारतोस तेच बघतो, मला कस दान लावलंस ते आधी सांग " रघुकाका
"अरे रघु , माझा फासा उभा राहिलाय , म्हणजे त्याच्या चारही बाजूचं सगळं दान, 4 & 6 आहेत म्हणून मला पुन्हा खेळायचा अधिकार आहेच " अस म्हणून बंडूभाऊनू सोंगटी बसल्या जागेवरूनच फेकून मारली आणि दोघेही हमरा तुंमरीवर आले आणि दोघानीही एकमेकांच्या गच्यांड्या पकडल्या...
एकच गोंधळ झाला , काहींनी मजा चालली आहे समजून दोन्ही पार्टीच्या इतर खेळाडूंनी एकमेकांशी मोठ मोठ्याने ओरडून झोंबा झोंबी सुरू केली , फेकून मारलेली सोंगटी बत्तीला (petromax) लागली आणि तिची काच फुटली व कळोंख झाला... एकच आरडा ओरडा झाला... घरातील सर्व बायका, मुलं भांडणाच्या आवाजाने मांडवीत धावली , कारण काय झालं तेच नीट समजेना.
रात्रींचे तेव्हा 4 वाजले होतें... ह्या दोघांना काळोखात आवरताना कुणालाच काही समजेना ...
भांडणाचा आवाज एवढा मोठा की कोठरवाल्यांच्या दुकानावर दरोडा पडला समजून शेजारचे लोक हातात मिळेलं ते घेऊन धावून आले ...
हे 50 लोक आणि इतर गावातले 100 लोक हातात काठ्या वगैरे घेईन धावले व मांडवीत जीथे खेळ चालला होता तिथे काचाच काचा व काळोख ... कुणालाही काही समजेना... एकच हल कल्लोळ झाला....
गडबडीत चोर समजून कुणालातरी मार पडला तर काय करायचं ...
अशी परिस्थिती..
शेवटी भाऊनि सर्वाना मोठ्या आवाजात काहीही झालेलं नाहीये . अस सांगून कस बस आवरलं .
तोपर्यंत सकाळचे 5 5.30 वाजले होते . चक्क उजाडलं होतं
सर्वाना स्थिर स्थावर करेपर्यंत सकाळचे 6 वाजले ....
भाऊंनी सर्वांना चहा घ्या म्हणून सांगितलं .
150 -200 कप चहा मामीने केला व सर्वाना दिला ...
" बामन काय खेळतत त्ये हमका समाजल बारी नाय "
अस म्हणून लोक आपल्या घरी निघुन गेले.
मंडळी, भाऊंनी बंडूकाका व राघूभाऊना जवळ बोलावलं , एकमेकांचा हात हातात दिला, व बाबानो हा खेळ होता , बर झालं काय बर वाइट झाल नाही असं म्हणून हा न भूतो न भविष्यती आशा खेळाची सांगता केली ....
मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनंताच्या रात्री आपल्या घरी असाच सोंगट्याचा खेळ रंगत आलाय ...
उगाच नाही लोक म्हणतात सोंगट्या खेळायच्या तर त्या फक्त कोठारातच, ती मजा इतर कुठेही येण शक्य नाही....
आता 25 ते 30 वर्षानी आपण सर्वांनी प्रेत्येकाच्या घरी गणपती आणायचं ठरवलंय ....
त्यातच तळवड्याचा नंबर पण लागू शकतो....
तर पुन्हा एकदा मांडायचा का सोंगट्याचा पट.....
अनंत प्रभुदेसाई.