Tuesday, 1 October 2019

दत्तामामा

*दत्तामामा*

दत्तामामा 83 वर्षांचा व सुमतीमामी 72 वर्षांची झाली. खरं नाही वाटत.

वेळ कोणतीही असो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे इतक्या हसत मुखाने स्वागत करणारी आणि फक्त स्वागत नाही तर त्यांची  सर्वतोपरी बडदास्त ठेवणारे हे आमचे मामा मामी.

मामाशी माझी खास दोस्ती होती. अपार कष्ट करून देसायांची डेअरी , बैलगाडी, माडीवाल घर झालं पाहिजे अशी त्याची रास्त स्वप्न होती ती बऱ्याच  प्रमाणात पुरीही झाली. "माझ्या मामाची रंगीत गाडी हो" अस म्हणत त्याच्या गाडीतून फिरण्यासाठी  मी खूप आतुर होतो पण मी मुंबईला आल्यामुळे मला ते शक्य झालं नाहि आणि आता ते दिवस परत येणहि अशक्य .
मामिला फुलांची खूप आवड आहे. ती इतकी गोरी कि फुल चांगली कि मामी!! अस मला अजूनही वाटत!!  ह्या मामीला सहसा पुरुष करतात यी सर्व काम म्हणजे झाडावर चढण, जमीनीला चोप काढणं अशी सर्व काम करता येतात याच मला अजूनही आश्चर्य व कौतुक वाटत.

मामी बरोबर तळीच्या माळावर गुर चरायला नेतानाच्या दिवसांची मला अजूनही आठवण आहे. रगाड्यामधे झाडावर चढून जांभळं, जांभी पाडून दिल्याचं चांगलं आठवत. असो. ह्या सर्व ठिकाणी मामी बरोबर जाण्याची माझी इच्छा जेंव्हा तिच्याजवळ व्यक्त केली तेव्हा आता retired होतोयस ना, राहायला ये 4 दिवस मग जाऊ , अस म्हणाली.

गेल्याच वर्षी होळीच्या वेळी दादा,वाहिनी, मंदा, अनुजा, मी ,अकुल, श्रेया असे सर्वजण  मामा मामीं ना भेटून आलो. परत निघताना मामा मामीला सर्वां प्रमाणेच परंतु सगळ्यात शेवटी नमस्कार केला तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यातून येणार पाणी खूप काही सांगून गेलं. आमची गाडी अकुल चालवत होता . त्यानं ती थांबवली आणि तो श्रेयाला म्हणाला विचर आता....
"बाबा तूम्ही नमस्कार केल्यावरच त्यांना इतकं का वाईट वाटलं???" आजही माझ्याकडे या प्रशनाच उत्तर नाही!!!! 

नंदा प्रभुदेसाई

No comments:

Post a Comment