माझी घर खरेदी..... भाग ३ ...
अनुभव - शब्दांकन
नंदा प्रभुदेसाई
एक दिवस अनुजाला ऑफीसमधून यायला थोडा उशीर झाला म्हणून तिला सोडायला तिचे बॉस आले होते घरी . तेही ठाण्यातच रहात होते . माझी त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले तुमचं HDFC च जे लोन आहे ते परत करण्यापेक्षा हे घर विका आणि चांगल्या ठिकाणी दुसरं घ्या !!!
त्यांना काय सांगणार माझी कहाणी!!!
ठाण्यामधला चांगला एरिया म्हणजे भास्कर कौलनी, चांगली शाळा सरस्वती, खरेदीचं चांगलं
ठिकाण गोखले रोड - नौपाडा . आपण इकडे जगा घेऊया का ??? .......... मी !
वेड लागलंय का ... इतर लोक काहीही सांगतील , आता आधी आपल्या मुलीला चांगल्या शाळेत घालू ,मग नंतर सगळं ..
एक दिवस फिरत फिरत भास्कर कौलनी मध्ये आलो व एका बील्डिंगच बांधकाम चाललं होतं ते पाहायला म्हणून थांबलो.
चौकशी केल्यावर बरेचसे फ्लॅट बुक झाले असले तरी 4, 5 खाली आहेत अशी माहिती मिळाली. रेट रू.1000 psf. 1bhk Rs.6.50 lakhs ....
नाही जमायचं आपल्याला ....
सध्याच्या घराचे 3.50 L तरी मिळाले पाहिजे व 3L लोन असं झालं तर .... ...
आमच्या घराला एका agent ने पार्टी आणली . ते NRI वाले होते . त्यांनी सर्व पैसे एकदम देऊ पण किंमत 2.50 लाख व घराचा ताबा लगेचच पाहिजे अशा अटी घातल्या. ...
विचारचक्र सुरू झालं. पुन्हा रात्री झोप नाही. आता आम्ही दोन , एक छोटी मुलगी आणि आतापर्यंतचा विदारक अनुभव ....
....... आणि आम्ही त्या पार्टीला रहाती जागा एका पोरीला हातातोंडाशी पकडून विकून टाकली . .....
त्यांच्या अटी ची जाणीव म्हणजे ताबा लगेचच द्यायचा मी कबूल करून बसलो .
"आधी पैसे तर देऊ देत मग बघु ... वाटलं इतकं का सोपं आहे ते......"
माझा अंदाज इथेच साफ चुकला आणि ठरलेली रक्कम त्यांनी माझ्या bankमध्ये जमा केली, उरलेली हातात दिली , आणि आज शनिवार आहे , उद्या आम्हाला घराची किल्ली पाहिजे , आज रात्री आमचे वडील इथेच तुमच्याबरोबर रहातील .(पैसे घेऊन आम्ही पळालो तर )अस सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली.....
आता काय करायचं , कुणाला सांगायच ? आणि ह्या छोट्या मुलीच कसं होणार ? ...
पहिल्यांदा भास्कर कॅलिनीतील त्या बिल्डरला गाठलं , यावेळी दादा बरोबर होता, शेवटचे 2 ब्लॉक बाकी होते , त्याने कींमत 7 लाख सांगितली आणि मी हुज्जत घालायला सुरुवात केली ....
"तुम्ही पहिल्याने 6.50 सांगितले होते व मला जास्त किंमत का सांगता ? मला जागा घ्यायची आहे !! "
" वो तो जमानेकीं बात हो गयी , यकीन करो कल ही मैने 5 वा माले का फ्लॅट यही भाव से बेचा है !"
"कितने मे बेचा है "
" जो भाव तुमको बोला वही , हम मारवाडी है , जबानके सच्चे राहते है "
" चलो जो भाव पे आपने 5 वा माले से लिया वही मुझे लगा दिजीए "
आमची जुगल बंदी ऐकून दादा म्हणाला मी घरी जाऊ का ? तू काय यांच्या नादाला लगतोस ...
तस सुद्धा दादा चा एकंदरीत स्वभाव , त्याच ते मितभाषी पण या तत्वात माझं हे बोलणं म्हणजे त्याने तिथे थांबणं मुश्किलच होत.
मी पुन्हा एकदा त्यांना म्हटलं
"हे 10000 घ्या आणि मला त्या 5व्या मजल्यावरच्या चा रेट लावा ."
" 7 लाख में कम नही होगा, जबान की कोई इज्जत तो करो "
" आपने 5 वा माले का फ्लॅट 1000 रुपये के भाव मे बेचा है और वो भी कल" मी जोरात टेबलावर हात आपटून सांगितलं
" आपके पास क्या सबुत है , जो भाव उसको वही अपको मीलेगा, जाओ पैसा नही तो ब्लॉक खरीदनेके लिये आते ही क्यू ?? "
..... आणि मी त्याला शब्दात पकडलं , दादाला तिथेच थांबवून स्कूटर वरून 10 मिनिटात बाळा च्या घरी गेलो , त्याला सगळं सांगितल, तू फक्त तुझा रेट त्याला सांगायचा ... बस माझी जागा पण बुक होतेय ...
कारण 1000 च्या रेटने बाळाने जागा बुक केल्याचे मला सांगितल होत.
जस त्या बिल्डरने बाळा आणि मला पाहिल तस त्याचा चेहरा एकदम उतरला ..... जबानीची सच्चाइ उघडी पडली आणि माझी , 8 व्या मजल्यावरची जागा रु.1000 च्याच रेटने बुक झाली ..... !
हुष्य !!! अजून लढाई संपली नव्हती तर आता कुठे सुरू झाली होती....
ज्या agent ने आमची सध्याची जागा विकली होती त्याला गाठलं व मला 6 महिन्यांनसाठी रहायला भाड्याची जागा पाहिजे व ती सुद्धा आजच, भाडं जास्त चालेल, deposit चे पैसे खिशात घेऊन आलोय, अग्रीमेंट नंतर करा आधी जागा द्या ! असं सांगितलं. इकडे उद्या संध्याकाळी ह्या माणसाला किल्ली द्यायची होती म्हणजे मी अनुजा व पोरगी घराबाहेर , कारण तसच ठरलं होतं!!!
सद्गुरू मधला एक टेम्पो भाड्याने घेतला , घरच सामान दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर न्यायचं आहे म्हणून आत्ताच टेम्पोत भरा म्हणून सांगितलं.
चौकशी करून दिवसाला कमीत कमी 500 रुपयांचा धंदा टेम्पो मालक करतो याची माहिती घेऊन ठेवली होती.
अजूनही भाड्याची जागा मिळाली नव्हती ,म्हणजेच वेळ आली तर दिवसाला 500 रुपये देऊन सामान टेम्पोतच ठेवायचं याची तयारी केली होती.
Agent ने मित्राचीच जागा आहे, भाडं 3000 व deposit 15000 सांगितलं . " भाडं 4000आणि Deposit 20000 मी देईन " पण जागा उद्या सकाळी ताब्यात पाहिजे , अग्रीमेंट करा किंवा नका करू कारण मला 6 महिन्यांसाठीच भाड्याची जागा पाहिजे , माझी नवीन जागा भास्कर कॉलनी , वर्धमान टॉवर या बिल्डींग मध्ये मला 4 महिन्यातच मिळणार आहे अस सांगितलं ....
Agent ने त्याच्या पद्धतीने मी सांगितलेलं सर्व चेक करून मला भाड्याच्या जागेची किल्ली देऊन टाकली.
घरी हा म्हातारा माणूस व आम्ही त्या रात्री राहिलो , सकाळी उठल्यावर चहा पाणी झालं ...
"काका , ठरल्याप्रमाणे ही किल्ली तुमच्या ताब्यात घ्या , आज संध्याकाळ पर्यंत सामान शिफ्ट करीन ...... जे इथे राहील ते तुमचं...व जे नेलं ते माझं "
"अहो तुम्ही कुठेही रहाल पण ह्या छोट्या मुलीच काय कराल ?"
एक काम करा , दुसरी जागा बघा , तुमचं सामान 4- 5 दिवसात शिफ्ट करा व नंतर हे घर आमच्या ताब्यात द्या , ही घ्या किल्ली , जरा ह्या मुलीचा विचार करा , फॅमिली वाले आहेत ना तुम्ही ...... त्या आजोबांची खात्री पटली की त्यांना कोणत्याही परिस्थितीत मी जागा देईनच...
मंडळी 4 च महिने भाड्याच्या घरात राहिलो , अतोनात हाल व्हायचे , विकत ची पोळी भाजी खायची , मुलीला सकूटरवरून न्यायचं , आणायचं आणि काय काय केलं ....
एकदा असच ही जागा बघायला आम्ही दोघ गेलो होतो , त्यावेळी अनुजा ने ओट्या साठी काहीतरी change सांगितला तर तो बिल्डर म्हणाला ,
" ये तो शादिके पाहिलेही बच्चेकी बात हो गयी , पहिला सब पैसे लाव बादमे देखेंगे "
इथे एक फार महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अनुजाच्या ऑफिसच loan फारच लवकर व एकदम कमी कष्ट करून मिळालं , नंतर तर त्यांनी स्टॅम्प duty चे ही पैसे दिले .
ठाण्याच्या ज्या भागात जागा सोडा पण कधी नुसतं बघायला तरी येइन अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तिथं रहायला आलो.....
नंतर दादानेही याच बिल्डींगमध्ये मोठी जागा घेतली.
अजूनही मी इथेच राहतो आहे. सर्व सोयीं इथे आहेत त्यामुळे आता तरी जागा बदलणार नाही .
हा प्रवास सांगण्याचा हेतू इतकाच मी फार काही मोठं केलं अस माझं म्हणणं बिलकुल नाही. आलेल्या अडचणीतून जस सुचलं तसे मार्ग काढले , कदाचित यापेक्षाही सोपा मार्ग होता किंवा असेल , पण मला तो नाही सुचला .....
माझ्या मुळे अनुजा , तिचे आई बाबा , माझी व तिची बहिणी भावंड कधी कधी इतके घाबरून जायचे की बस .....
पण माझ्यापुढे तरी दुसरा पर्याय काय होता ....
यातून कुणाला प्रेरणा मिळाली तर अतिशय आनंद होईल ....
जेव्हा जेव्हा 7 नंबर मधील आम्ही सर्व 15 ऑगस्टच्या ट्रीपला जातो तेव्हा "तू विरारची जागा कशी विकलीस, ठाण्याला कसा आलास आणि त्या टेम्पोतच रात्रभर सामान ठेऊन पुढे काय केलंस " ते जरा सांग बघू आम्हाला.... अस म्हणतात .
आणि शेवटी आम्ही तुम्हाला " उपरे" म्हणालो म्हणून तुम्ही ब्लॉक घेतलेत नाहीतर राहिले असतात आमच्यासारखे अस म्हणून .....
चियर्स..... !!
यानंतर मी घोडबंदर ह्या नवीन develop होत असलेल्या भागात दोन छोटी छोटी शॉप्स घेऊन तीही इच्छा पूर्ण केली.
बघू पुढे काय मार्ग दिसतो ते......
....... समाप्त ......
............ नंदा .......