Thursday, 3 October 2019

माधव

*माधव*

माधव बद्दल जे काही लिहीन ते थोडेच आहे. एवढेच म्हणेन सर्वार्थाने हा माझा गुरु , कोणतीही गोष्ट असू दे , मला cycle चालवायला शिकवण्यापासून , कॉलेज admisiioncha माझा फॉर्म भरणे,  कारण सांगायला हरकत नाही SSC झालेल्या मला तो इंग्लिश मधील फॉर्म पूर्णपणे वाचतही येत नव्हता. ( आता सुद्धा फार काही सुधारणा नाही हे तुम्ही समजला असालच) तर तो फॉर्म माझ्यावतीने भरून मॅक्सि ऍडमिशन मधवने ठाणा कॉलेज मध्ये घेऊन दिली. त्यावेळी Prof.Krishnan नि माधवला विचारलं सुद्धा 'क्या ऍडमिशन आपको लेना है क्या? ' मधवने माझ्याकडे बोट दाखवले . तो उंको फॉर्म भारने दो। काय सांगणार त्याला फॉर्म वाचताही येत नाही म्हणून. कशी बसजी मी फक्त सही करून ऍडमिशन झाली. प्रॉब्लेम इथेच  संपते तर मग काय. मला रेल्वे ने डोंबिवलीहून ठाण्याला  जयचपण यानेच शिकवलं!!                           नंतर आम्ही बाळदादाच्या clinik मध्ये रात्री अभ्यास काय केला, फाटाक्यांचा business काय केला, रात्रीचे गिरगाव ,दादर ला संपूर्ण रात्र गणपतीचे कर्यक्रम काय पहिले, एकाच दिवशी 9ते 12, 12ते3 & 3 ते 6 असे सलग अख्खा दिवस सिनेमा काय पहिले,  नाटकाचं तिकीट विकून हॉटेलिंग काय केलं, माझं इकॉनॉमिक्स च पुस्तक घेऊन प्रत्येक प्रकरणाचा माझा अभ्यास किती झालाय याची माधवने खात्रीपण करून घेतली. अशप्रकारे B.COM. मॅक्सयकडून करून घेतलं म्हणण योग्य ठरेल. फार काय मला पहिली नोकरी लागली त्या कंपनी मध्ये तो माझ्या interview ला अल्लाच पण इथे मी पगार किती मागावा हे सुद्धा त्यानेच मला सांगितलं!!!  नंतर share मार्केटचे धडे पण मी त्याच्याकडूनच घेतले!!!                    आमच्या कॉलेज जीवनात नंदा असेल तिकडेच माधव किंवा माधव तिथे नंदा अस समीकरण झालं . तस थोडं ते इतरांच्या द्रीष्टीनें त्रासदायकाही झालं असेल पण आमची मैत्री कमी झाली नाही.                                          नोकरीच्या निमित्त्यानं मला पार्ल्याला जावं लागलं, नंतर लग्न व नंतर ठाणे येथे वास्तव्य असा माझा प्रवास चालू आहे ज्यामध्ये एका बावळट माणसाला माधव ने इथपर्यंत घडवलं आहे.                    आज त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त्यानं पूर्व स्मृती जाग्या झाल्या. या प्रवासाला मधवची तसेच माझीही सर्व भावंडं साक्षी आहेत, इतरांनाही त्याची कल्पना असेल किंवा नसेल.                                माधव तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुला सुयश लाभो, तसेच तुम्हा उभयतांना चांगलं आरोग्य, ऐश्वर्य लाभो ह्याच माझ्या शुभेच्छा & इशवरचर्नी प्रार्थना.           
  नंदा.

No comments:

Post a Comment