Saturday, 28 September 2019

तू सिगारेट्स ओढतोस

तू सिगारेट्स ओढतोस

माझं कॉलेजचं शेवटच वर्ष होतं.(1979) परीक्षा झाल्यावर  गावाला गेलो होतो व परत मुंबईला यायचं की नाही याविषयी  जरा जास्तच विचार करीत होतो .

असच एक संध्याकाळी मी व भाऊ दुकान बंद करून घरी आलो. जेवायला थोडा वेळ होता व मामी जेवणाची तयारी करीत होती तिथे जरा बसलो होतो.

 भाऊ बाहेर ओटीवर त्यांच्या खाटवर विसरांती घेत पहुडले होते !!

इकडे तिकडे काहीतरी बोलता बोलता मामीने मला हळूच विचारलं !!  ( मामी ठाकुरदेसाई ना माहेरची , सगळ्यांची काळजी या लोकांना 😃😃)

मामी : नंदा , कॉलेज मधली मूल मुली एकत्र असतात ना रे !!

मी : हो पण तुला कस माहीत!!

मामी : नाही मी अस ऐकलय !! तस माझं काय म्हणणं नाही , पण विचारलं.

खरा मुद्द्याला हात तिने अजून घातला नव्हताच ....

मी: मामी , माझं college आता सम्पल !!
आता कुठेतरी नोकरी शोधावी लागेल.

मामी : पण मला खर सांग college मधली मुलं सिगारेट वगैरे ओढतात , तू नाही ना ओढत सिगारेट.....

आता हिला काय सांगायचं !

मी : नाही, मी नाही ओढत सिगारेट .

पण मला सांग सिगारेट ओढली म्हणजे काय मी अगदी नालायक झालो का ?? फुकट गेलो की काय मी !!

हे माझं वक्तव्य भाऊंनी बाहेर ऐकलं मात्र आणि ते एकदम धडाक्यात उठले आणि तडक घरात जिथे मी आणि मामी होतो तिथे आले.

मला वाटलं होतं ते झोपलेत आणि आमचं बोलणं त्यांना ऐकू जाणार नाही !!

त्यांना बघितल्याबरोबर मात्र माझं अवसान गळाल !!  (खर माझी काय अवस्था झाली ते इथे नाही लिहिता येत)

भाऊ : मी हिला हेच सांगतो .......
सीगारेट काय आम्ही पुरुषांनी नाही ओढायची तर काय बायकांनी ओढायची !!!

सारखी माझया मागे पीर पीर लावते , मूल मोठी झाली आता ...

झाली तर झाली बघतील त्यांचं ते काय करायचं आणि काय नाही करायचं ते !!!

आता मामी आणि मी एकमेकांकडे बघत होत !!

तरीसुद्धा तिने सांगितलंच
 " तू ह्यांचं मनावर घेऊ नको , बायकांनी सांगितलेली एखादी चांगली गोष्ट ऐकली तर या लोकांना प्रभुदेसाई कोण म्हणेल "

कोकणातील आई वडिलांचे वयात आलेल्या मुलांशी सबंध कसे असावेत याच हे उत्तम उदाहरण नाही का !!!

असच आणखी एक म्हणजे आंम्ही  मुलांनी कोणत्याही जातीच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्यांची कोणतीही अट नव्हती !!
😀😀😀

अनंत प्रभुदेसाई

No comments:

Post a Comment